नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ९६ जागांवर आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार चौथ्या टप्प्यात एकूण १७.७ कोटी मतदार आणि१.९२ लाख मतदान केंद्र आहेत.
या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशातील १७५ आणि ओडिशाच्या २८ विधानसभेच्या जागांवरही मतदान होत आहे. यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तेलंगणामध्ये मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १९ लाख मतदान अधिकारी १.९२ लाख मतदान केंद्रांवर १७.७ कोटीहून अधिक मतदारांचे स्वागत करतील. या टप्प्यात ८.९७ कोटी पुरूष आणि ८.७३ कोटी महिला मतदार आहेत.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील ११, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेशातील आणि पश्चिम बंगालीमधील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४, जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.
राज्यातील या मतदारसंघात आज मतदान
पुणे
बीड
शिरूर
छत्रपती संभाजीनगर
जालना
अहमदनगर
मावळ
शिर्डी
रावेर