
मुंबई: जिओने एक नवा प्लान सादर केला आहे. हा Ultimate streaming plans आहे. हा पोस्टपेड प्लान आहे. याची किंमत ८८८ रूपये आहे. यात युजर्सला १५हून अधिक ओटीटी अॅप्स, अनलिमिटेड कॉल आणि 30Mbpsस्पीडवर डेटा मिळेल.
या प्लानमध्ये युजर्सला जिओ सिनेमा प्रीमियम, नेटफ्लिक्स(बेसिक), प्राईम व्हिडिओ(Lite), डिस्ने प्लस हॉटस्टार हे ओटीटी प्लॅटफॉर्म मिळतात. हा प्लान जिओ फायबर आणि जिओ फायबर युजर्ससाठी आहे.
किती मिळणार इंटरनेट डेटा
कंपनीने याला अनलिमिटेड प्लान्स हे नाव दिले आहे. मात्र यावर जिओ एअर फायबर युजर्स १००० जीबीपर्यंत डेटा आणि जिओ फायबरसाठी ३३०० जीबीपर्यंतची मर्यादा आहे.
८००हून अधिक टीव्ही चॅनेल्स
जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला ८००हून अधिक डिजीटल टीव्ही चॅनेल्स पाहायला मिळतील. अनेक युजर्ससाठी हे फायदेशीर ठरू शकतात. या प्लानसोबत ५० दिवसांचा व्हाऊचर मिळत आहे जो आयपीएल धन धना धनसाठी आहे. याच्या मदतीने युजर्सला ५० दिवसांसाठी फ्री इंटरनेट मिळणार. ही ऑफर ३१ मेपर्यंत आहे.
ज्यांना फास्ट इंटरनेटची सुविधा हवी आहे ते 300Mbps डाऊनलोड स्पीड असलेला प्लान निवडू शकतात. 300Mbps स्पीडच्या प्लानची किंमत १४९९ रूपये आहे.