Sunday, July 7, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वIncome Tax : करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आयकर विभागाने सुरु केली 'ही' नवी...

Income Tax : करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आयकर विभागाने सुरु केली ‘ही’ नवी सुविधा

मुंबई : नवे आर्थिक वर्ष सुरु होताच अनेक बँकांकडून तसेच विभागाकडून अनेक नियमांमध्ये बदल केले जात होते. सध्या आयकर विभागाकडून (Income Tax) करदात्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे. आयकर विभागाने आयटीआर दाखल करताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी एक नवी सुविधा चालू केली आहे. आता करदात्याला विभागाने पाठवलेल्या नोटीस किंवा किती कर भरायचा राहिला या सगळ्या गोष्टी पाहणे सोयीस्कर होणार आहेत.जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने आता आपल्या करदात्यांसाठी अधिकृत नोटीस जारी केल्या आहेत. विभागाने ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन फीचर सुरू केले आहे ज्याचा फायदा करदात्यांना जारी केलेल्या नोटिस, पत्र आणि सूचनांचा मागोवा घेण्यास मदत करेल. यावर क्लिक करून, करदात्याला सर्व प्रलंबित कर नोटिसा एकाच ठिकाणी ट्रॅक करणे सोपे होणार आहे. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या या सुविधेमुळे करदात्यांची मोठी सोय होणार असून आता त्यांना आयकर कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.

अशी आहे प्रक्रिया

करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. आता तुम्हाला लॉग इन करावे लागेल. आता डॅशबोर्डवरून तुम्ही ‘पेंडिंग ॲक्शन्स’ विभागात जाऊ शकता आणि येथून ‘ई-प्रोसिडिंग्स’ वर जाऊ शकता. या फीचरमुळे करदात्यांचा वेळ वाचणार असून नोटीसला उत्तर देणेही सोपे होणार आहे.

नवीन टॅबमध्ये ‘ही’ माहिती मिळेल

  • कलम १३९(९) अंतर्गत सदोष सूचना
  • कलम २४५ अंतर्गत अधिसूचना
  • कलम १४३(१)(अ) अंतर्गत प्रथमदर्शनी समायोजन
  • कलम १५४ अंतर्गत सुओ मोटो सुधारणा
  • इतर कोणत्याही आयकर प्राधिकरणाने जारी केलेली नोटीस
  • स्पष्टीकरणासाठी मागितलेली माहिती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -