Monday, June 30, 2025

२० रूपयांच्या चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते, उत्तर ऐकून खाणे सोडाल

२० रूपयांच्या चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते, उत्तर ऐकून खाणे सोडाल

मुंबई: बाजारात विकली जाणारी चिप्सची पाकिटे बाहेरून दिसायला जितकी रंगीबेरंगी असतात तितकीच ती आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्यातील स्वादिष्ट आणि कुरकुरीत चिप्स आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की या एका चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते आणि ते आरोग्यासाठी किती हानिकारक आहे.



चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते?


एका चिप्सच्या पॅकेटचे वजन ५० ग्रॅम असते. यात साधारण १२ ते १३ टक्के तेल असते. तर काही चिप्सच्या पॅकेटमध्ये तेलाचे प्रमाण १५ टक्के असते. चिप्सच्या पॅकेटमध्ये आढळणारे हे तेल ट्रान्स फॅट्स असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. स्पष्ट शब्दात सांगायचे तर हे चिप्स तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकतात.



किती धोकादायक असतात ट्रान्स फॅट्स


नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार जगातील ५ अब्ज लोकांचे जीवन ट्रान्स फॅटने घटवले आहे. आता ते लोक हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त आहेत. चिप्सच्या पॅकेटमध्ये वापरले जाणारे तेल हे ट्रान्स फॅट असते. म्हणजे तुम्ही जितक्या वेळे चिप्स खाता तितक्या वेळा तुमचे आयुष्य संकटात टाकत आहात.


या चिप्सच्या पॅकेटमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण हे प्रति शंभर ग्रॅममध्ये दोन ग्रॅमपेक्षा अधिक असता कामा नये. दरम्यान बाजारात उपलब्ध असणारे हे पदार्थ या नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहिलेलेच बरे.

Comments
Add Comment