‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी
मुंबई : मे महिन्यातील उन्हाळ्याचे दिवस चालू असताना मुंबईत अचानक अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे हवेत गारवा आला आहे. वातावरण सतत थंड, गरम होत आहे. अशा हवामानात झालेला हा बदल त्रासदायकही ठरु शकतो. पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यावी ते सविस्तर जाणून घ्या.
- पावसाळ्यात जीवाणुंचे संक्रमण होऊन पोटात मुरडा येतो. पावसाळ्यात प्रदूषित पाणी आणि खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने डायरियाला आपण आमंत्रण देतो.
- प्रदूषित पाण्यामुळे हा आजार जडतो. स्वच्छ पाणी प्या. जेवण झाकून ठेवा. पाणी उकळून प्या. काहीही खाण्यापूर्वी हात धुवायला विसरु नका.
- पावसाळ्यात फूड पॉयझनिंगचा धोका जास्त असतो. पोटात मुरडा, उल्टी होते. शरीरात कमजोरी जाणवते.
- या आजारात शरिरात पाण्याची कमी जाणवते. कच्चे आणि स्वच्छ सलाड खा. रस्त्याशेजारी मिळणारे खाद्य अजिबात खाऊ नका. त्यासाठी दूषित पाणी वापरलं जाण्याची शक्यता असते.
- तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. इम्युनिटी बूस्ट करणारे पदार्थ खा. तसेच घरच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. तब्येत ठिक नसेल तर आराम करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.