Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीLoksabha Election : पैसे द्या,मग मत देतो ; आंध्र प्रदेशात मतदारांची अजब...

Loksabha Election : पैसे द्या,मग मत देतो ; आंध्र प्रदेशात मतदारांची अजब मागणी

नवी दिल्ली : सध्या देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान उत्साह पाहायला मिळाले. परंतु, आंध्र प्रदेशमधील पलानाडूच्या सट्टानपल्ली प्रभागात मतदारांनी एक अजबच मागणी केल्याची बाब पुढे आली आहे. सट्टानपल्लीमधील १८व्या प्रभागात उमेदवाराने मतदारांना मतांच्या बदल्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न केल्याने तेथील मतदारांनी आंदोलन केले. आश्वासन देऊनही रक्कम न मिळाल्याने मतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

संपूर्ण राज्यामध्ये ही समस्या नवीन नाही. वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मतांसाठी पैसे दिले जात असल्याचे समोर आले आहे. एक हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत ही रक्कम असल्याचेदेखील सांगितले. राज्यात शनिवारी प्रचार संपला होता, नंतर तरीही अनेक ठिकाणी नोटा वाटप होत असल्याचा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ प्रभागात एका उमेदवाराने पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण काही महिलांना पैसे मिळाले नाहीत. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोंडेवरम गावात लोकांनी निदर्शने केली. विजयवाडा येथील आमदार उमेदवाराने एका जवळच्या सहाय्यकाला नगरसेवक कार्यालयात पाठवले, जिथे मताच्या बदल्यात एक हजार रुपये दिले जात होते असे तेथील स्थानिक मतदाराने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -