Monday, December 2, 2024
Homeमहत्वाची बातमीLoksabha Election 2024 : लोकसभेचा चौथा टप्पा; राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत किती...

Loksabha Election 2024 : लोकसभेचा चौथा टप्पा; राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.

महाराष्ट्रात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान होत आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१% मतदान झालं आहे. नंदुरबारमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची टक्केवारी : –

नंदुरबार – २२.१२%
जळगाव – १६.८९%
रावेर – १९.०३%
जालना – २१.३५%
छत्रपती संभाजीनगर – १९.५३%
मावळ – १४.८७%
पुणे – १६.१६%
शिरूर – १४.५१%
अहमदनगर – १४.७४%
शिर्डी – १८.९१%
बीड – १६.६२%

जाणून घ्या विधानसभा निहाय कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले?

पुणे लोकसभा मतदारसंघ : १६.१६%
कसबा पेठ – १८.१०%
कोथरूड – १८.२०%
पर्वती – १७.८४%
पुणे कॅन्टोन्मेंट – १३.८९%
शिवाजीनगर – १३.९४%
वडगाव शेरी – १४.%

मावळ लोकसभा मतदारसंघ : १४.८७ %
चिंचवड – १४.९३%
कर्जत – १४.२७%
मावळ – १४.%
पनवेल – १४.७९%
पिंपरी – १३.०९%
उरण – १७.६७%

शिरूर लोकसभा मतदारसंघ : १४.५१ %
आंबेगाव – १८.४७%
भोसरी – १२.७९%
हडपसर – १४.४०%
जुन्नर – १७.०६%
खेड आळंदी – १४.५४%
शिरूर – १२.२५%

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -