
मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.
महाराष्ट्रात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान होत आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१% मतदान झालं आहे. नंदुरबारमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची टक्केवारी : -
नंदुरबार - २२.१२% जळगाव - १६.८९% रावेर - १९.०३% जालना - २१.३५% छत्रपती संभाजीनगर - १९.५३% मावळ - १४.८७% पुणे - १६.१६% शिरूर - १४.५१% अहमदनगर - १४.७४% शिर्डी - १८.९१% बीड - १६.६२%