Sunday, May 11, 2025

ताज्या घडामोडीक्राईम

Crime : धक्कादायक! आईच मुलाला द्यायची ड्रग्ज सेवन आणि घरफोडीचे धडे

Crime : धक्कादायक! आईच मुलाला द्यायची ड्रग्ज सेवन आणि घरफोडीचे धडे

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


मुंबई : आई आणि मुलाचे नाते पवित्र मानले जाते. मात्र याच पवित्र नात्याने केलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक आई आपल्या मुलाला चांगली शिकवण देते पण यावेळी एक स्त्री आपल्या मुलाला चक्क चोरी करण्याचे धडे देत असल्याचा धक्कादायक प्रकार मध्य मुंबईत घडला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील या घटनेने नागरिकांसह पोलीस देखील चक्रावले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी एका अट्टल चोराला अटक केली आहे. त्याने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्या आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. घरफोडी करण्यासाठी घराबाहेर पडत असताना त्याची आईच त्याला ड्रग्जचं सेवन करायला लावायची, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.


काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, '२४ वर्षीय रवी महेसकर हा नियमित गुन्हेगार आहे. त्याच्या सर्व गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याची आई विजेता महेसकर (५०) हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. घरफोडीसाठी बाहेर पाठवण्यापूर्वी ती त्याला ड्रग्ज देत, तसेच चोरीच्या मालमत्तेची विल्हेवाट लावत'. सध्या विजेता महेसकर फरार असून काळाचौकी पोलिसांनी आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे.

Comments
Add Comment