Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीCBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलीनींच केलं टॉप!

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलीनींच केलं टॉप!

कसा डाऊनलोड कराल निकाल?

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १३ मे रोजी म्हणजेच आज इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी हा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.gov .in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. यासह DigiLocker वेबसाइट – digilocker.gov.in आणि UMANG ॲपवर सुद्धा निकाल तपासता येईल. इयत्ता १२ वीच्या निकालापाठोपाठ आजच दहावीचा निकाल सुद्धा सीबीएसई तर्फे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यंदाही बारावीच्या परिक्षेत मुलींनीच टॉप केलं आहे.

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींच्या टक्केवारीत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ९०. ६८% विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या तर यावर्षी टक्केवारी ९१.५२% इतकी आहे. दुसरीकडे मुलांच्या बाबतीतही यंदा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढला आहे. गेल्या वर्षी ८४.६७% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तीच टक्केवारी यंदा ८५. १२% इतकी आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा ५० टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ६० टक्के होते. यंदा सुद्धा ६.४० टक्क्यांनी मुलींनीच निकालामध्ये बाजी मारली आहे.

CBSE इयत्ता १२ वी परिक्षेसाठी या वर्षी १६,३३,७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १६,२१, २२४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १४,२६,४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या निकालात या वर्षी २४ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर, १ लाख १६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा एकुण ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सीबीएसईच्या इयत्ता १२वीचा निकाल कसा तपासायचा?

१. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२. सीबीएसईचा बोर्ड निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.

३. खात्यात लॉग इन करा.

४. रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

५. तुम्ही आता सीबीएसई बोर्डाचे १२वीचे निकाल तपासू शकता.

६. आपण निकाल तपासू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -