Abdu Rozik : अब्दुचा साखरपुडा एक पीआर स्टंट? स्वतःच सांगितलं 'त्या' फोटोंमागील सत्य

म्हणाला, 'माझ्यासारख्या लहान उंचीच्या मुलाला...


अबुधाबी : बिग बॉस फेम गायक अब्दु रोझिक (Bigg Boss fame Abdu Rozik) सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड चर्चेत आहे. नुकताच त्याचा साखरपुडा (Engagement) पार पडला आहे, तर येत्या ७ जुलै रोजी तो लग्नबंधनात अडकणार असल्याची त्याने घोषणा केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन आपल्या होणार्‍या पत्नीला अंगठी घालतानाचे फोटोज शेअर केले होते. हा साखरपुडा २४ एप्रिल रोजी पार पडला असल्याचे त्याच्या कॅप्शवरुन कळले. या फोटोजमध्ये अब्दुने आपल्या पत्नीचा चेहरा मात्र दाखवला नव्हता. यामुळे आता चाहत्यांनी एक नवा प्रश्न उपस्थित केला आहे. अब्दुचे अभिनंदल करत असतानाच काही चाहत्यांनी मात्र हा पब्लिसिटी स्टंट (Publicity stunt) असल्याचा आरोप केला आहे.


हल्ली आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी सेलिब्रिटी अक्षरशः काहीही पीआर स्टंट करताना दिसतात. त्यामुळे कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टीवर नाही, हे ओळखणे कठीण झाले आहे. त्यातच अब्दुने २० व्या वर्षीच लग्नाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा पीआर स्टंट असावा, त्याच्या एखाद्या नवीन गाण्यासाठी तो पब्लिसिटी करत असावा, अशी शंका चाहत्यांना आली. यावर आता स्वतः अब्दुने खुलासा केला आहे. हा पीआर स्टंट नसून मी खरंच लग्न करत आहे, असं त्याने स्पष्ट केलं आहे.


अब्दुने शारजाहच्या अमीरा नावाच्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्याच्या काही दिवसांपूर्वी त्याने लग्नाची घोषणा केली होती. याबाबत चाहत्यांनी याला पीआर स्टंट म्हटल्याचे सर्व आरोप अब्दुने फेटाळून लावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, 'मी माझ्या कोणत्याही म्युझिक व्हिडीयोचा पीआर नाही करत. माझ्यासारख्या लहान उंचीच्या व्यक्तीला प्रेम मिळालं आहे, हे काहींना बघवत नाही' असेही अब्दुने म्हटले.



अब्दु आणि अमीराची चार महिन्यांची ओळख


लहान वयात लग्न करण्याबाबत २० वर्षीय अब्दुने सांगितले की, एका फूड जॉईंटवर अमीरासोबत भेट झाली. त्यावेळी एकाच नजरेत प्रेम झाले. आपली प्रेयसी खूपच समजूतदार आहे, असे त्याने सांगितले. त्याने पुढे म्हटले की, अमीरा खूपच सुंदर आहे. तिचे लांब केस आणि सुंदर डोळे आहेत. आम्ही दोघांना एकमेकांना चार महिन्यांपासून ओळखतो. ती एक बिझनेस एडमिनिस्ट्रेशनच्या विषयाची विद्यार्थीनी आहे. ती समजूतदार असून आमच्यात चांगली बाँडिंग आहे असेही अब्दुने म्हटले.



ईश्वराच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित


अब्दुने म्हटले की, माझी उंची ११५ सेमी आहे तर तिची उंची १५५ सेमी आहे. या जगात अनेक असे लोक आहेत, दिव्यांग आहेत आणि त्यांना आपल्या जीवनाचा जोडीदार मिळतो. मी लहान असताना मला जीवनसाथी भेटणार की नाही, याची चिंता सतावत असे. पण, ईश्वराच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झाले असल्याचे त्यांने सांगितले.



कोण आहे अब्दु रोझिक?


ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने गायलेली 'ओही दिली जोर', 'चकी चकी बोरॉन' आणि 'मोदर'ही गाणी प्रसिद्ध आहेत. मात्र, 'बिग बॉस १६' मध्ये आल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात त्याचे फॅन फॉलोईंग खूप वाढले. यानंतर, तो सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात झळकला होता. त्याशिवाय, २०२३ मध्ये तो 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी १३' मध्येही सहभागी झाला.

Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात