Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीWeather Update : 'या' शहरात अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचे नागरिकांना आव्हान!

Weather Update : ‘या’ शहरात अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचे नागरिकांना आव्हान!

पुढील चार दिवस ‘असं’ असेल वातावरण, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विजांचा गडगडाट, वादळ, गारपीट अशा वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे त्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. असा राज्यासह ऊन पावसाचा खेळ सुरू असताना हवामान खात्याने आणखी मोठी घोषणा केली आहे.

मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलं आहे. आजपासून पुढील चार दिवस म्हणजे १२ ते १८ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अनेक भागांमध्ये पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा ४०-५० किमी प्रतितास वेग पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ५०-६० किमी प्रतितास वेग पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

‘या’ शहरांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा व हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत असं असेल वातावरण

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाजनुसार शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ असणार आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 °C आणि 27 °C च्या आसपास असेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -