Monday, January 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमालकाच्या मालमत्तेवर भाडेकरूचा कब्जा

मालकाच्या मालमत्तेवर भाडेकरूचा कब्जा

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

मालमत्तेसाठी आणि पैशासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, याची अनेक ठिकाणी आपल्याला उदाहरणे पाहायला मिळतात. रविराज यांचा बाजारपेठेमध्ये मोठा गाळा होता. अनेक वर्षं ते स्वतः त्या गाळ्याचे दुकान चालवत होते. हा गाळा त्यांच्या आजोबांपासून वडिलांकडे, वडिलांकडून रविराज यांच्याकडे आला होता. काही कारणास्तव त्या गाळ्याचे कर न भरल्यामुळे, बीएमसीकडून रवी राजांना पहिली नोटीस आली. त्या नोटीसवर रविराजाने आपल्या वडिलांच्या नावे स्टे घेतला. काही दिवसांनी पुन्हा बीएमसीची नोटीस आली. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या नावाने स्टे घेतला.

तिसरी नोटीस जेव्हा आली, त्यावेळी त्यांनी आपल्या भावाच्या नावाने त्या प्रॉपर्टीवर स्टे घेतलेला होता. ते घेण्यासाठी त्यांनी दोन वकील नेमलेले होते. त्या वकिलांना या मालमत्तेची पूर्ण कल्पना होती. त्याच दरम्यान त्यांनी हा गाळा एका रोहिंग्याला चालवायला दिलेला होता. रोहिंग्याने आणि रविराज यांच्या वकिलाने आपापसात समझोता करून, हातमिळवणी केली. त्या गाळ्याची खोटी कागदपत्रे बनवून, कोर्टामध्ये ही प्रॉपर्टी आमची आहे आणि ती माझ्या ताब्यात हवी. कब्जासाठी त्यांनी केस फाईल करून, कोर्टाने ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याची ऑर्डर दिली.

प्रॉपर्टी ताब्यात घेतल्यानंतर रविराज यांना समजताच, कोर्टात केस फाईल केली. ही प्रॉपर्टी माझी असल्याचे त्यांनी सांगितले. याच्यासाठी मी तीन वेळा कोर्टातील नोटीस विरुद्ध स्टे ऑर्डर आणलेले होते. हे पेपर त्याने कोर्टाला दाखवले.
रविराज यांनी दुसरा वकील करून, त्या वकिलांना सर्व माहिती दिल्यानंतर, त्या वकिलाने रविराज यांची केस बार काऊंसिलच्या समोर उभी केली. तीन वेळा नोटीस जाऊनही रोहिंगा बार काऊंसिलला आला नाही. त्यावेळी रविराज यांच्या नवीन वकिलाने बार काऊंसिलचा मुद्दा मांडला की, जे रविराजचे पहिले वकील होते, त्यांनी तीन वेळा स्टे आणले, त्याचा मुद्दा ऑर्डर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये दाखवला नाही.

तसेच हे वकील रविराजांचे असताना, त्यांनी रोहिंग्याची केस आपल्या ताब्यात घेतली कशी आणि तीही त्याच प्रॉपर्टीवर. रोहिंग्याचे वकील सांगत होते की, ही प्रॉपर्टी नसून दुसरी प्रॉपर्टी आहे, तर बार काऊंसिलने विचारलं. मग रविराज यांची प्रॉपर्टी कोणती ते तुम्ही दाखवा. रोहिंग्यांने एका दुकानाची चुकीची कागदपत्रे त्यांना दाखवली. तसेच रविराजांच्या वकिलाने सत्याची साथ न देता, चुकीच्या पद्धतीने मार्ग निवडला. यामध्ये वकिलाने रोहिग्यांची साथ दिली, हे बार काऊंसिलच्या मते चुकीचे होते. रोहिंग्यांने दिलेल्या कागदपत्रांची चौकशी करताच, ते खोटे असल्याचे निदर्शनास आले.

रोहिंगा हा एन. आर. आय. असल्यामुळे, त्याने इथे केस टाकताना, सेंटर गव्हर्नमेंटची तशी परवानगी काढलेली नव्हती. कारण एन. आर. आय. यांना येथे केस फाइल करायची असेल, तर सेंटर गव्हर्नमेंटकडून तशी परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय इथे केस करता येत नाही. हे बार काऊंसिलसमोर दर्शवण्यात आले. रोहिंग्याने गाळ्याचे मालक रविराजच्या वकिलाशी हातमिळवणी करून, गाळा आपल्या ताब्यात घेण्यासाठी खोटी कागदपत्रे बनवून, कोर्टालाही फसवलेलं होतं.

एवढंच नाही, तर रविराजांच्या वकिलाला त्या गाड्यांबद्दल, पेपरबद्दल पूर्ण कल्पना होती आणि पैशासाठी त्यांनी चुकीचे कागदपत्रे करून हात मिळवणी केली होती. पण बार काऊंसिलसमोर हे प्रकरण गेल्यानंतर ४२० हा गुन्हा दाखल करण्यात आला. काही वेळा पैशाच्या लालचेसाठी वकील आपल्याच क्लाईंटशीही गद्दारी करू शकतात व पैसा कमावण्यासाठी विरुद्ध पार्टीलाही आपल्या क्लाइंटचे पेपर देऊ शकतात. हे वरील केसमधून समजून येते.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -