Friday, October 31, 2025
Happy Diwali

काव्यरंग

काव्यरंग

सांग कधी कळणार तुला

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

गंधित, नाजूक पानांमधुनी गंधित, नाजूक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी गंधित, नाजूक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी

अर्थ कधी कळणार तुला अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

निळसर, चंचल पाण्यावरती निळसर, चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती निळसर, चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती

छंद कधी कळणार तुला छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

गीतकार- मधुसूदन कालेलकर

Comments
Add Comment