Mother's Day 2024 : मातृदिनी आईसाठी काही खास करायचंय? मग 'असा' करा मातृदिन साजरा

मुंबई : आईसाठी आपण कितीही केलं तरी ते कमीच असतं. कारण आईच्या नि:स्वार्थ प्रेमाची तुलना कशा सोबतही होऊ शकत नाही. आई ही केवळ मुलाची आईच नाही तर कुटुंब सांभाळण्याचा आधार असते. ती आपल्यासाठी जे काही करते, त्याच्या तुलनेत आपल्याला तिच्यासाठी काही करण्याची संधी फारच कमी मिळते. आपल्या जीवनातील आईचं महत्त्व समजून घेण्यासाठी आणि सुंदर आयुष्य दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार 'मातृदिन' म्हणून साजरा केला जातो.


यावर्षी १२ मे रोजी मदर्स डे साजरा केला जात आहे. मातृदिन निमित्ताने तुम्हालाही तुमच्या आईचा दिवस स्पेशल बनवायचा असेल मात्र नेमकं काय करावं हे सुचत नसेल तर ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आईबद्दलचे हे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी मदर्स डे दिवसी तुम्ही आईला अशा काही खास भेटवस्तू देऊ शकता. तसेच नेहमीप्रमाणे यंदाचा मदर्सडे स्पेशल बनवायचा असेल तर तुम्ही या प्रकारे दिवसाचे प्लॅन करू शकता.



'असा' करा मातृदिन साजरा



  • जर तुम्हाला सकाळपासूनच आईचा दिवस खास बनवायचा असेल तर तुमच्या आईला फुले देऊन शुभेच्छा द्या. सकाळी उठल्याबरोबर तिला पुष्पगुच्छ द्या आणि तिला मातृदिनाच्या शुभेच्छा द्या.

  • मदर्स डेच्या दिवशी तुमच्या आईसाठी खास नाश्त्याचे प्लॅन करा. आपल्या हातांनी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करा. याशिवाय हेल्दी मीलचे प्लॅन करा. तुम्हाला नाश्ता बनवणे शक्य नसेल तर तुम्ही ब्रंच देखील प्लॅन करू शकता.

  • आईला सगळ्या कामांना सुटी देऊन टाका. तिची कामं तुम्ही करा आणि तिला आराम द्या.

  • मदर्स डे स्पेशल बनवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एक सुंदर संध्याकाळ घालवा. यासाठी थोडी सजावट करा, गाणी वाजवा, डान्स सोबतच काही गेम्स खेळा. याशिवाय तुम्ही तुमच्या आईच्या आवडीचा कोणताही चित्रपट पाहू शकता. मदर्स डे सुपर स्पेशल बनवण्यासाठी केक कापा. अशा प्रकारे तुम्ही मातृदिनाची संध्याकाळ संस्मरणीय बनवू शकता.

  • मदर्स डे निमित्त आईला एखादं छानसं गिफ्टदेखील देऊ शकता. आईला काही ना काही तरी घ्यायचं असतंच. पण उद्या घेऊ, नंतर घेऊ म्हणून ती चालढकल करत असते. ती वस्तू नेमकी कोणती याचा शोध घ्या आणि थेट तिच तिला हवी असणारी वस्तू तिच्या पुढे आणून ठेवा. हे सरप्राईज पाहून ती नक्कीच खूश होईल.


आईला द्या 'या' खास भेटवस्तू



  • महिलांना पर्स खूप आवडतात आणि त्यांच्यासाठी पर्स खूप उपयुक्त आहेत. अशात तुम्ही तुमच्या आईला पर्स भेट देऊ शकता. बाजारात पर्सचे अनेक प्रकार आहेत, जसे की हँडबॅग, टोट पर्स, स्लिंग बॅग, क्लच किंवा मोठ्या आकाराच्या पर्स. आईच्या गरजेनुसार पर्स गिफ्ट करा.

  • एक सुंदर साडी आईच्या हृदयाला स्पर्श करेल. तुम्ही त्यांना शिफॉन, ऑर्गेन्झा किंवा जॉर्जेटची सुंदर फ्लोरल प्रिंट आणि बॉर्डर साडी भेट देऊ शकता.

  • मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या आईला सुंदर दागिने किंवा ॲक्सेसरीज भेट देऊ शकता. कानातले, चोकर, नेक चेन, व्यायामाचे दागिने इत्यादी देऊ शकता. आईलाही हे दागिने आवडतील आणि ती कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही दिलेले दागिने परिधान करू शकेल.

  • बहुतेक बायकांना बांगड्या आवडतात. मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईला बांगड्याही गिफ्ट करू शकता. त्यांच्या एका साडीशी जुळवून तयार केलेल्या बांगड्यांचा सेट घ्या किंवा बांगड्याच्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या ठेवून भेट द्या.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात १२ आरोपींचा सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२

जयपूर-अजमेर महामार्गावर २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट

केमिकल टँकर आणि लीपीजी ट्रकमध्ये धडक, एकाचा मृत्यू जयपूर (वृत्तसंस्था) : मंगळवारी रात्री १० वाजता जयपूर-अजमेर

टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा नियमावलीच्या छताखाली

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ॲप आधारित वाहतूक सेवेबाबतचे धोरण येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार असून या