Friday, July 5, 2024

मंगळसूत्र

मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणे आणि लग्नाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात. मंगळसुत्रातले काळे मणी भारतीय स्त्रीया जीवाभावाने जपतात. “मंगळसूत्र म्हणजे नुसते काळे मणी नाहीत.”तर “विवाहितेची पवित्र्याची, सरलतेची, मांगल्याची मंगलखूण आहे.

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

काळे मणी तिला प्राणप्रिय होते. जीवाभावाने जपे ती त्यांना. वैजू मंगळसूत्र अभिमानाने मिरवे. या घरात सकाळी सकाळी चोर शिरले. सगळीकडे कागद, कागद आणि कागद. चोरांना हव्या होत्या नोटा नि नोटाच!

“काय शोधता आहात?” वैजूने
सहजपणे विचारले.
“नोटा कुठे ठेवल्यायत?”
“कुठल्या नोटा? मी फक्त लेखिका. माझे यजमान अधू आहेत. इथे फक्त तुमच्या लेखी जिला रद्दी म्हणतात, तीच सापडेल.”
“म्हणजे?”
“अरे चोरांनो रद्दी म्हणजे तुमच्या लेखी बिनकामाचे कागद!”
“नोटा कुठे आहेत?”
“नोटा जवळजवळ ‘न’के बराबर आहेत जेमतेम
डाळ-तांदळापुरत्या.”
“मग दागदागिने?”
“ते खोटे वापरते मी.”
“खोटे?”

“चार लग्न तर असतात सीझनला. पॉलीश केले की काम भागते माझे. कोणी विचारत सुद्धा नाही
खरं की खोटं!”
“हे मंगळसूत्र?”
“ते मात्र खरं आहे.”
“मग द्या बघू काढून. चला, जल्दी करा!”
“मुळीच देणार नाही.”
“अगं देतेस की पिस्तूल चालवू?”
“अहोऽऽ“ वैजूनं नवऱ्याला हाकारलं.
“काय गं?” नवरा जाम घाबरला होता.
“ते लाटणं आणा ताटाळ्याला लावलेलं.” वैजू ओरडली.
“हे बघ! त्याला पिस्तूलनी उडवू?”
“हिंमत आहे का पिस्तूल चालवायची?”

“अगं वा गं! आमच्यावर आवाज चढवतेस? एका प्राणाचं मोल ते काय गं? आमच्यासाठी त्याची किंमत शून्य आहे.”
“पण माझ्यासाठी ते माझं सर्वस्व आहे.”
“बाई गं, मुकाट्यानं मंगळसूत्र काढून दे.”
“आणि काय करू?”
“आम्हाला दे.”
“आणि नाही दिलं तर?”
“अरे वढा रे ती काळी माळ. झटशीर वढा.”
“मंगळसूत्र म्हणजे नुसते काळे मणी नाहीत.”
“मग काय?”
“विवाहितेची मंगलखूण आहे. पवित्र्याची, सरलतेची, मांगल्याची.”
“वढा रे वढा.”
“लाटणऽऽ द्या.”
नवऱ्याने तेवढ्यात लाटणे आणले. तिने ते चोरांच्या साथीदाराच्या टाळक्यात हाणले. तो खाली पडला.
“बाबूऽऽ ही बाय भैंकर हाय.”
तो पडता पडता कळवळला.
“ए बाई ऽऽ मरायचंय का?”
“मारा ना हिंमत असेल तर.”
“एवढी त्या काळ्या माळेला जपते तू?”
“प्राणापेक्षा जास्त जपते मी.”
‘‘खेचा रे ऽऽ’’
‘‘धावाऽऽ’’ ती किंचाळली.
शेजारच्यांनी ती
किंकाळी ऐकली.

लाटणी घेऊन शेजारणी धावल्या. एकच गलका झाला. आजी पुढे झाली.
“हे माझं मंगळसूत्र मागताहेत.” वैजू म्हणाली.
“काय रे ए लफंग्यांनो? तुम्हाला बायको आहे
ना प्रत्येकाला?”
“आहे ना! आहे की.”
“तिला लग्नात काळे मणी घातलेत ना?”
“हो घातले की.”
“तरी काळी माळ म्हणता मंगळसूत्राला? तुम्हाला हृदय आहे ना?”
“असं का म्हणता आजी?” त्यांच्यातल्या म्होरक्याने विचारले.
“अरे, प्रत्येक स्त्री आपल्या मंगळसूत्राला प्राणपणानं जपते.”
“जीवापेक्षा भारी?”
“प्राणापलीकडे जपणूक.”
“असं काय आहे त्या काळ्या मण्यात?”
“काय नाही? विचारतोस कसा? नि का?”
“विचारलं गं म्हातारे.”

“प्राण गेले तरी गळ्यातले काळे मणी काढत नाही. प्रत्येक विवाहिता चितेवर चढताना मंगळसूत्रासकट जळते.”
“असले जरी काळेमणी,
सौभाग्य त्याचवर कोरले
पती असता, फक्त त्यावर
नाव त्याचे लागले.”

“आता घरला जा. नाहीतर चाळीतल्या दहा लाटण्यांचा प्रसाद घेऊन जा. मारा गं बायांनो.” गर्दी क्षणार्धात पांगली. काकूआजी समाधाने
घरी परतल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -