Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाIPL 2025MI vs KKR: कोलकत्ताची प्लेऑफमध्ये दाबात एंट्री, मुंबईवर १८ धावांनी केली मात...

MI vs KKR: कोलकत्ताची प्लेऑफमध्ये दाबात एंट्री, मुंबईवर १८ धावांनी केली मात…

MI vs KKR: पावसामुळे मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स मधील सामना तब्बल पावने दोन तास उशिरा म्हणजेच सव्वा नऊ वाजता सुरु झाला. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सने जिंकला. हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी घेतली. पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाल्याने १६-१६ षटकांचा झाला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या फिल सॉल्टने पहिल्याच चेंडुवर षटकार मारत आक्रमक पवित्रा घेतला, पण षटकाच्या पाचव्याच चेंडुत तुषाराने त्याला परत पाठवले. बुमराहने आपल्या विशेष गोलंदाजीचा नमुना दाखवत सुनील नरीनला शुन्यावर तंबुत धाडले. मुंबईच्या अंशुल कंबोज याने केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर त्रिफळाचीत केलं. श्रेयसने 10 बॉलमध्ये 7 धावा केल्या. वेंकटेश अय्यर ४२ धावा बनवुन सुर्यकुमारच्या हातात झेलबाद झाला. आंद्रे रसल आणि नितीश राणा देखील विशेष काही करु शकले नाहीत. १६ षटकांच्या सामन्यात कोलकत्ताने मुंबईसमोर १५७ धावांचे आव्हान उभं केले.

कोलकत्ताचे आव्हान परतवुन लावण्यासाठी आलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. इशान किशनने २२ चेंडुत ४० धावा बनवल्या. मात्र नरीनच्या चेंडुवर तो झेलबाद झाला.रोहीत शर्मादेखील विशेष खेळी करण्यात असमर्थ ठरला. १९ धावा बनवुन तो बाद झाला. सुर्यकुमार ११ धावा करुन रसलच्या चेंडुवर धावबाद झाला.

शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता शिगेला पोहचवणाऱ्या सामन्यात शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडुवर नमनदीप बाद झाला, तर तिसऱ्या चेंडुत तिलक वर्मा ३२ धावांवर बाद झाला. मुंबईचा संघ ८ गडी गमावत १३९ धावा बनवु शकला. कोलकत्ताने मुंबईवर १८ धावांनी मात करत प्रथम प्लेऑफमध्ये पोहचण्याचा बहुमान पटकावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -