Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीHeart Attack: हृदयविकाराच्या धोक्यापासून वाचवतील या गोष्टी, दररोज खाल्ल्याने होणार फायदे

Heart Attack: हृदयविकाराच्या धोक्यापासून वाचवतील या गोष्टी, दररोज खाल्ल्याने होणार फायदे

मुंबई: आजकाल खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आढळून येतो. अनेकदा लोक बाहेर तळलेले मसाल्याचे पदार्थ खाणे पसंत करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का सतत बाहेरचे खाल्ल्याने तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला बाहेरचे खाणे कमी करून आपल्या डाएटमध्ये काही गोष्टी समाविष्ट कराव्या लागतील.

या गोष्टींचे करा सेवन

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कमी वयातच लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या सतावू लागतात. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा. दररोज पालक, कोबी, मेथी, कोथिंबीर, सारख्या गोष्टींचे सेवन करा.

हृदयासाठी अक्रोड

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज अक्रोडचे सेवन करा. अक्रोड हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. यातील फायबर आणि मायक्रो न्यूट्रिएंट पुरेशा प्रमाणात असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. सोबतच ब्लड प्रेशरही कंट्रोल करतात.

हृदयासाठी टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करा

जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खात आहात तर त्याचे शरीराला जबरदस्त फायदे होतात. यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -