मुंबई: हल्ली लोक बाटलीतील पाणी पिण्याला पसंती देतात. उभ्या उभ्या बाटलीतील पाणी संपवता येते. मात्र असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. आयुर्वेदात सांगितले आहे की उभे राहून कधीही गटागटा पाणी पिऊ नये. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पोटाच्या समस्या वाढू शकतात. तुम्हीही जर उभे राहून पाणी पित असाल तर सावधान. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर तुम्ही परिणाम करत आहात. यामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.
ही आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत
प्रत्येकाने पाणी ग्लासात घेऊन एका ठिकाणी बसून पाणी प्यायले पाहिजे. थोडे थोडे करून पाणी प्यायले पाहिजे. उभे राहून पाणी पिणे धोकादायक असते. आरामात पाणी पिणे योग्य असते. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाकडे पाणी पोहोचते.
उभे राहून पाणी पिण्याचे नुकसान
उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो.
पचनाचा त्रास संभवतो.
किडनीच्या रुग्णांनी उभे राहून पाणी पिऊ नये..
उभे राहून पाणी पिण्याचे साईडइफेक्ट
आयुर्वेदाच्या तज्ञानुसार उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास संभवू शकतो. जर बराच वेळ ही सवय असेल तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे आर्थरायटिस अथवा गाठीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडू लागते.