RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत बंगळुरुला फलंदाजीला बोलवलं. मागच्या सामन्यातील स्लो-ओव्हर रेटमुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला या सामन्यात खेळता आले नाही. त्याच्या जागी कुमार कुशाग्र या खेळाडुचे पदार्पण झाले. बंगळुरुकडुन सलामीला आलेल्या विराट कोहलीने आक्रमक सुरुवात केली. विराटने १३ चेंडुत २७ धावा बनवल्या, मात्र ईशांत शर्माच्या चेंडुवर तो झेलबाद झाला. फाफ डुप्लेसी काही खास करु शकला नाही. फक्त ६ धावा बनवुन तो परतला.
बंगळुरुसाठी विल जॅक्स आणि रजत पाटीदारने निर्णायक खेळी केली. दोघांनी ८८ धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. पाटीदारने अर्धशतक झळकावले, तर जॅक्सने ४१ धावा बनवल्या. बंगळुरुचे बाकीचे फलंदाज खास खेळी करण्यात असमर्थ ठरले. २० षटकांच्या सामन्यात बंगळुरु १८७ धावांचे आव्हान उभं करु शकले.
बंगळुरुच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेले दिल्लीचे सलामीवीर विशेष खेळी करण्यात अयशस्वी ठरले. वॉर्नर १ धाव बनवुन परतला. तर जैक फ्रेझर २१ धावा बनवू शकला. पंतच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अक्षर पटेलने संघासाठी ३९ चेंडूत ५७ धावांची खेळी खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात असमर्थ ठरला. त्याच्याशिवाय शाई होपने २९ धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले . यश दयालने ३ तर लोकी फर्ग्युसनने २ बळी घेतले. तर स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज आणि कॅमेरून ग्रीन यांनी १-१ विकेट घेतली. बंगळुरुचा तब्बल ४७ धावांनी विजय झाला. बंगळुरुचा हा सलग पाचवा विजय असुन त्यांचे प्लेऑफमधील आव्हान कायम आहे.