Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

CSK vs RR : चेपॉकमध्ये चेन्नईने राजस्थानला धुतले, प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले

CSK vs RR : चेपॉकमध्ये चेन्नईने राजस्थानला धुतले, प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामातील ६१व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला पाच विकेटनी हरवले. १२ मेला रविवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईला विजयासाठी १४२ धावांचे आव्हान दिले होते.


चेन्नईने हे आव्हान १८.२ षटकांत पूर्ण केले. सीएसकेनचा या हंगामातील १३व्या सामन्यातील सातवा विजय आहे. ते पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा १२व्या सामन्यातील चौथा पराभव आहे.


चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४१ बॉलमध्ये ४२ धावांची नाबाद खेळी केली. यात दोन षटकारांसोबत एका चौकाराचा समावेश आहे. ऋतुराज चेपॉकच्या स्लो पिचवर शेवटपर्यंत टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. सलामीवीर रचिन रवींद्रनेही दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १८ बॉलमध्ये २७ धावा केल्या. राजस्थानसाठी आर अश्विनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नांद्रे बर्गर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.



रियान आणि जुरेल यांची जबरदस्त खेळी


टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ५ बाद १४१ धावा केल्या. राजस्थान रॉयल्ससाठी रियान परागने ३५ बॉलमध्ये नाबाद ४७ धावांची खेळी केली. रियानने आपल्या खेळीत तीन षटकारांशिवाय एक चौकार लगावला. ध्रुव जुरेलने २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १८ बॉलमध्ये २८ धावांची खेळी केली. सीएसकेसाठी सिमरजीत सिंहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

Comments
Add Comment