Chhatrapati Sambhajinagar : मातृदिनी उडाली खळबळ! गर्भनिदान करणारं रॅकेट पोलिसांनी केलं उद्ध्वस्त

  98

केवळ १९ वर्षीय तरुणी करत होती हा प्रकार


छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मातृत्वाचा सन्मान करणारा दिवस (Mother's day) साजरा केला जात असतानाच दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. देशभरात सगळीकडे महिलांच्या हक्कांविषयी आणि स्त्री-पुरुष समानतेविषयी जनजागृती होत असताना संभाजीनगरमधील ही घटना धक्का देणारी आहे. संभाजीनगरमधील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भलिंग चाचणी (Gender prediction test) केली जात होती, आश्चर्याची बाब म्हणजे केवळ १९ वर्षीय तरुणी या प्रकाराची मास्टरमाईंड होती. पोलिसांनी हे रॅकेट उधळून लावले असून या तरुणीला ताब्यात घेतले आहे.


छ. संभाजीनगरमध्ये तिरुपती नगर परिसरात राहत्या घरी लिंग निदान करणाऱ्या तरुणीवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आले.


आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता इंजिनिअरिंग करणाऱ्या एक तरुणीकडून हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी १२ लाख ७८ हजारांची कॅश देखील सापडली. या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप, टॅब देखील सापडले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. एका तरुणीने केलेला हा प्रकार पाहून शहरात खळबळ उडाली आहे.



राज्यात बंदी असूनसुद्धा होत आहेत 'हे' प्रकार


गेल्याच आठवड्यात राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंता वाटावी एवढी कमी झालेली आहे. राज्यात बंदी असूनसुद्धा गर्भलिंगनिदान (Prenatal Sex Determination) आणि गर्भपात (Abortion) जोरात सुरु असल्याचं समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. त्यामुळे या २२ जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरचे प्रमाण म्हणजे एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण चिंतादायकरीत्या घटल्याचे समोर आले आहे. जालन्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

Comments
Add Comment

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

अंत्यसंस्काराची तयारी; तो चक्क जिवंत परतला घरी आणि एका क्षणात वातावरण बदलले

जळगाव : रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. घरी तिरडी आणली

College students clashes: पुण्यात भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, कॅम्पसमध्ये कोयते आणि हातोड्याने हल्ले

पुणे: शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. एका नामांकित

जळगाव बस अपघाताप्रकरणी आमदार जावळे संतापले, PWD अधिकाऱ्यांना दिला दम

जळगाव: भुसावळ रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. इंदूरहून जळगावकडे जाणारी श्री गणेश लक्झरी खासगी बस आमोदा

CM Fadnavis podcast Maharashtra Dharma: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

'महाराष्ट्रधर्म' या विशेष पॉडकास्ट मालिकेचे पहिले चरण प्रदर्शित मुंबई: ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि

Ashish Shelar On MNS : मंत्री आशीष शेलार यांनी मनसेला झापलं, दिला निर्वाणीचा इशारा

'संयमाची परीक्षा पाहू नका, नाहीतर...' भाषावादाच्या पार्श्वभूमीवर शेलारांची मनसेला तंबी मुंबई: शनिवारी झालेल्या