Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीChandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा!

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा!

हिंमत असेल तर ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं द्या

बोचरी टीका करत चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत आज ठाकरे गटाचंच मुखपत्र असलेल्या ‘सामना’ (Saamana) वर्तमानपत्रात छापून आली आहे. स्वतःच्याच पक्षाच्या नेत्याकडून घेतलेली स्वतःचीच मुलाखत स्वतःच्याच मुखपत्रात छापल्याने याची सर्वच स्तरांतून खिल्ली उडवली जात आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा आहे’, असं ते म्हणाले आहेत. सोबतच पाच परखड सवाल करत हिंमत असेल तर या प्रश्नांची उत्तरं द्या, असं खुलं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंना पाच प्रश्न विचारले आहेत व हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं खुलं आव्हान केलं आहे.
१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय ?
२. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
३. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात ?
४. राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात ?
५. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता ?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे. जय महाराष्ट्र!, असं बावनकुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -