Sunday, July 7, 2024
HomeदेशPM Narendra Modi : भाजपाला विजयाची खात्री असतानाही राज ठाकरे यांना सोबत...

PM Narendra Modi : भाजपाला विजयाची खात्री असतानाही राज ठाकरे यांना सोबत घेतले कारण…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला खुलासा

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) अनेक पक्षांमध्ये चुरस असली तरी महाराष्ट्रात ही लढत मुख्यत्वे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपाने एकत्र सरकार स्थापन केले. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसलाही सत्तेत सामील करुन घेण्यात आले.

त्यानंतर आता गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) महायुतीला पाठिंबा दर्शवला. मात्र, त्यामुळे भाजपाला विजयाची पूर्ण खात्री असताना इतक्या पक्षांना सोबत का घेतले गेले, असा प्रश्न उपस्थित झाला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या एन्ट्रीवर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांना सोबत घेण्यामागे काय कारण आहे, याचा त्यांनी खुलासा केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, राज ठाकरे आम्हाला नवीन नाहीत. मी आधी सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. गेल्या १० वर्षापासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत. मात्र, तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचे स्वागत केले आहे. आपल्या लोकशाहीसाठी हे चांगले आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे केव्हाही चांगलेच असते, असे मोदींनी म्हटले.

आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर राज ठाकरेंचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे आम्हाला वाटते. त्यामुळे हे एकत्र येणे केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी आहे, असे नाही. लोकसेवेसाठी एकत्र येणे, हा त्यामागचा उद्देश आहे. वस्तुतः देशहितासाठी जो कोणी आमच्याकडे येईल, त्या प्रत्येकाचे आम्ही सहर्ष स्वागतच करू, असे मोदींनी स्पष्ट केले.

महायुतीसाठी राज ठाकरे यांच्या जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीत मनसे निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. मात्र, भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभाही घेण्यास राज ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील कणकवली, पुणे या दोन ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या असून आज कल्याणमध्ये राज यांनी सभा होत आहे. कल्याणमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व ठाण्यातील नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -