Thursday, January 15, 2026

Nitesh Rane : आधी स्वतःच्या कपाळावरचा शिक्का पुसा!

Nitesh Rane : आधी स्वतःच्या कपाळावरचा शिक्का पुसा!

आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

नालासोपारा : ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी काल एका जाहीर सभेत खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर "मेरा बाप गद्दार है," असं लिहिलंय, हे गद्दार आहेत, आणि ते गद्दारच राहतील, असे म्हटले होते. त्यावर आज भाजपाचे प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नालासोपारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कपाळावर "मेरा बाप नपुंसक है", असा जो शिक्का लागला आहे, तो अगोदर पुसावा आणि नंतर दुसऱ्यांवर टीका करावी, असा जोरदार पलटवार केला.

भाजपचे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज ते वसईच्या दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्ताने भाजपतर्फे नालासोपारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, साधूंची हत्या, श्रद्धा वालकर हत्याकांड इ. घटनांची पुनरावृत्ती नको असेल तर मोदी यांना सत्तेवर आणा. काँग्रेसला संधी दिली तर आपल्याला आपले सण देखील साजरे करता येणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >