Suresh Jain : ठाकरे गटाला दिलेल्या राजीनाम्यानंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा!

  152

भाजपात होणार सामील?


जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत काल ठाकरे गटाला (Thackeray Group) पुन्हा एक मोठा धक्का मिळाला. ज्येष्ठ नेते सुरेश जैन (Suresh Jain) यांनी ठाकरे गटाला काल रामराम ठोकला. यानंतर ते थेट जळगावात दाखल झाले. मात्र, यानंतर कोणती भूमिका घेणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. मतदानासाठी आपण जळगावात (Jalgaon) दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर अखेर त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. या निवडणुकीत त्यांनी महायुतीला (Mahayuti) पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.


मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सुरेश जैन हे महायुतीला पाठिंबा देतील असे सूतोवाच केले होते. ते खरे ठरले असून विकासाच्या मुद्द्यावर आपण महायुतीसोबत असल्याचे जैन यांनी सांगितले. याआधी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात सहभागी नसेन, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, मी सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहे. वयोमानानुसार आणि प्रकृती अस्वाथ्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. या पुढे जे चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी राहणार, मात्र कोणत्याही पक्षात मी सहभागी नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.


सुरेश जैन म्हणाले, महायुतीने असं एकही क्षेत्र सोडलेलं नाही की जिथे त्यांच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी होत नाही. ते मला आवडत आहे आणि देशालाही त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठी आणि हितासाठी ते काम करत असतील आणि या देशाला २०४७ पर्यंत तिसरी शक्ती बनवण्याचं स्वप्न बाळगत असतील, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण देशाला म्हणजेच शेतकरी असो, आदिवासी असो वा स्त्रिया त्यांना सशक्त बनवण्याची त्यांची जी भूमिका आहे, ती मला आवडली म्हणून मी हा पाठिंबा देत आहे, असं सुरेश जैन म्हणाले. मात्र, मी कोणत्याही पक्षात नसेन, चांगल्या भूमिकेला माझा पाठिंबा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



कार्यकर्त्यांसाठी मी कुठलाही मेळावा घेणार नाही


कार्यकर्त्यांसंदर्भात प्रश्न विचारला असता सुरेश जैन म्हणाले, मी एकेका कार्यकर्त्याला बोलावून माझी भूमिका सांगणार नाही. मी मेळावा घेणार नाही किंवा प्रचारही करणार नाही. प्रेस नोट अथवा मीडियाच्या माध्यमातून जो विचार कार्यकर्त्यांपर्यंत जाईल तो जाईल, असं सुरेश जैन म्हणाले.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ