Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीNarhari Zirwal : दादा की काका? नरहरी झिरवाळ यांनी केला 'त्या' व्हायरल...

Narhari Zirwal : दादा की काका? नरहरी झिरवाळ यांनी केला ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खुलासा

मविआच्या नेत्यांसोबत का दिसले झिरवाळ?

दिंडोरी : सध्या देशभरात लोकसभेची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राजकीय फायद्यासाठी नेत्यांची पक्षांतरेही सुरु आहेत. त्यातच नाशिकमधील (Nashik) दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले होते. एका फोटोमध्ये ते महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांसोबत दिसून आल्याने ते शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाणार की काय, अशी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या फोटोबाबत आता खुद्द नरहरी झिरवाळ यांनी खुलासा केला आहे. मी कुठेही जाणार नसून अजितदादांसोबतच कायम आहे, असं ते म्हणाले आहेत.

नरहरी झिरवाळ म्हणाले की, मी भगरे यांचा प्रचार करत असल्याची चुकीची बातमी फोटोच्या माध्यमातून पसरवली गेली. त्यामागची खरी कहाणी वेगळी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार भास्कर भगरे यांचा ज्या गावात प्रचार सुरू होता, त्या गावात मला पूजेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावात गेलो होतो. मी फक्त त्या ठिकाणी एका मंदिराच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे असलेल्या लोकांच्या आग्रहा खातर मी आदिवासी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बागुल सर आहेत त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसलो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -