Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीJio OTT Plan : जिओकडून ८८८ रुपयांचा नवीन 'ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅन' सादर

Jio OTT Plan : जिओकडून ८८८ रुपयांचा नवीन ‘ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅन’ सादर

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि जिओ सिनेमा सारख्या १५ प्रीमियम ॲप्सचा समावेश

अमर्यादित डेटासह 30 Mbps चा स्पीड

मुंबई : रिलायन्स जिओने (Reliance Jio) स्ट्रीमिंग प्रेमींसाठी नवीन पोस्टपेड ओटीटी बंडल योजना (Postpaid OTT Bundle Plan) आणली आहे. या प्लॅनसह, ग्राहकांना केवळ १५ प्रीमियम ओटीटी ॲप्स (OTT Apps) मिळत नाहीत तर अमर्यादित डेटा देखील मिळतो, ज्यामुळे ते त्यांच्या आवडत्या ॲप्सवर हवं तेव्हा आणि त्यांना पाहिजे तितका वेळ कार्यक्रम पाहू शकतात. हा प्लॅन दरमहा रु. ८८८ च्या परवडणाऱ्या किंमतीत येतो आणि तो जिओफायबर (Jio fiber) आणि जिओ एअरफायबर (Jio Air Fiber) या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० एमबीपीएसचा स्पीड (30 Mbps) मिळेल. याव्यतिरिक्त, नेटफ्लिक्सचे मूलभूत प्लॅन, ॲमेझॉन प्राईम आणि जिओसिनेमा प्रीमियम सारख्या १५ हून अधिक आघाडीच्या ओटीटी ॲप्स प्लॅनसह एकत्रित आहेत. म्हणजेच या ॲप्सचे सबस्क्रिप्शन केवळ प्लॅनसह उपलब्ध असेल. या प्लॅनची​आणखी एक खास गोष्ट म्हणजे, १० एमबीपीएस किंवा ३० एमबीपीएस प्लॅन वापरणारा नवीन सदस्य असो किंवा विद्यमान वापरकर्ता असो, ₹ ८८८ चा पोस्टपेड प्लॅन प्रत्येकासाठी आहे. प्रीपेड प्लॅन असलेले सर्व विद्यमान वापरकर्ते नवीन पोस्टपेड प्लॅनमध्ये सहजपणे अपग्रेड करू शकतात.

याशिवाय, नुकतीच जाहीर केलेली जिओ आयपीएल धन धना धन ऑफर देखील या प्लॅनवर लागू होईल. पात्र जिओफायबर किंवा एअरफायबर ग्राहक त्यांच्या जिओ होम ब्रॉडबँड कनेक्शनवर ५०-दिवसांच्या डिस्काउंट क्रेडिट व्हाउचरचा लाभ घेऊ शकतात. हे ३१ मे २०२४ पर्यंत उपलब्ध आहे. जिओ धन धना धन ऑफर खास T२० सीझनसाठी तयार करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -