
आमदार नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन
नालासोपारा : पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नालासोपारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी राणे यांच्या बरोबर नालासोपारा विधानसभा संपर्क प्रमुख राजन नाईक,जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील,वसई विधानसभा संपर्क प्रमुख मनोज पाटील,मीडियाप्रमुख मनोज बरोत आंबीतर मान्यवर उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना श्रद्धा वालकर, साधू हत्याकांड,यावर भाष्य करताना सांगितले की,सद्हाया महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी मुसलमानांचे फतवे निघत आहेत. हिंदुस्थानात ,हिंदू खतर्यात आले आहेत. मुस्लिम लीगची भाषा उद्धव ठाकरे बोलत आहेत.त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी मोडिजिना बळ देण्याची गरज आहे. येथील भाजपचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा यांना निवडून दिल्यास ते थेट येथील विकासासाठी पंतप्रधानाशी बोलू शकणार आहेत इतरांना निवडून दिल्यास त्यांना विकासाच्या निधीसाठी लायनीत उभे राहावे लागेल.
महाविकास आघाडीला मत म्हणजे लव जिहाद, लॅण्ड जिहादच्या मत असेल तर सवर्ण मत म्हणजे मोदी ,देश,आणि हिंदू राष्ट्राला मत असेल असे त्यांनी शेवटी सांगितले.पालघर मध्ये लढत असलेल्या बहुजन विकास आघाडी बाबत राणे यांना विचारले असता त्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली तर हिंदूंसाठी ५० केसेस झाल्या. त्रिंबट्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.