Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाDelhi Capitals : ऋषभ पंतवर बीसीसीआयची निलंबनाची कारवाई! ३० लाखांचा दंडही ठोठावला

Delhi Capitals : ऋषभ पंतवर बीसीसीआयची निलंबनाची कारवाई! ३० लाखांचा दंडही ठोठावला

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024) जोरदार हवा आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक संघांत चुरस सुरू आहे. मात्र, त्यातच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला एक मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. शिवाय त्याला ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील लढत ७ मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झाली होती. या लढतीत दिल्लीला निर्धारीत वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. धीम्या गतीने ओव्हर टाकल्याबद्दल आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दिल्लीकडून झालेली ही तिसरी चूक आहे. ज्यामुळे रिषभ पंतला ३० लाख रुपये दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनच्या उर्वरित सदस्यांना प्रत्येकी १२ लाख किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या ५० टक्के, यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएल आचारसंहितेच्या कलम ८ नुसार, दिल्ली कॅपिटल्सने मॅच रेफरीच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले. यानंतर, अपील पुनरावलोकनासाठी BCCI लोकपाल समितीकडे पाठवण्यात आले. लोकपालने व्हर्च्युअल सुनावणी घेतली आणि मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील असे स्पष्ट केले. त्यामुळे ऋषभ पंत दिल्लीकडून पुढील सामना खेळू शकणार नाही. दिल्लीची पुढील मॅच १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -