Monday, July 8, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखहिंदूंची चिंताजनक घट

हिंदूंची चिंताजनक घट

देशाच्या स्वातंत्र्यापासून हिंदू-मुस्लीम वाद जगजाहीर आहे. मुळातच देशाला स्वातंत्र्य मिळताना मुस्लिमांसाठी पाकिस्तान व हिंदूंसाठी भारत (हिंदुस्तान) हीच संकल्पना नजरेसमोर ठेवण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळताना पाकिस्तानातून हिंदूंना कशा प्रकारे भारतात पाठविण्यात आले, ही दृश्ये पाहिल्यावर आजही अंगावर शहारे येतात. त्याचवेळी मुस्लीम पाकिस्तानात जात असताना गांधी-नेहरू यांना आलेल्या मुस्लिमांवरील प्रेमामुळे या देशात मुस्लीम राहिले आहेत. पाकिस्तानला मात्र निर्मितीच्या वेळी ५५ कोटी रुपये गांधी-नेहरूंच्या भूमिकेमुळे भारताकडून पाकला द्यावे लागले होते. १९४७ पासून २०१४ पर्यंत हिंदू बहुसंख्याक असतानाही या देशात काँग्रेस व इतर पक्षांमुळे हा देश कधी हिंदुस्थान झाला नाही आणि हिंदुत्वाचा उदो उदो राज्यकर्त्यांकडून फारसा झाला नाही.

१९४७ ते २०१४ पर्यंत मुस्लीम व अन्य अल्पसंख्याकांचे लाड करण्यातच भाजपा वगळता त्या त्या सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली. याचमुळे मुस्लीम समाज अल्पसंख्याक असतानाही बहुसंख्य हिंदूंवर डोळे वटारण्याचे धाडस दाखवत होता. जातीय दंगली या देशात घडत गेल्या. २०१४ नंतर या चित्रात बदल झाला. मोदी सरकारच्या काळात हिंदूंना खऱ्या अर्थाने या देशात सुरक्षितता प्राप्त झाली. धार्मिक जातीय दंगली थंडावल्या. याच काळात तब्बल ५०० वर्षांनंतर हिंदूंच्या देशात रामलल्लाच्या मंदिराची अयोध्येत उभारणी झाली. मोदी सरकार नसते, तर कधी एकेकाळी देशात रामराज्य आणणाऱ्या रामलल्लाला त्याच्याच जन्मभूमीत अयोध्येमध्ये निर्वासितासारखे राहण्याची वेळ आली असती.

भारत हा हिंदुस्तान बनण्याच्या, हिंदू राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला असताना या देशात हिंदूंची लोकसंख्या घटत असल्याचे व मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याचे आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील धार्मिक लोकसंख्येनुसार प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात उघड झाले आहे. ही बाब हिंदूंसाठी नक्कीच चिंताजनक असून हिंदूंनी यावर विचारमंथन करणे आवश्यक आहे. देश स्वतंत्र झाला, त्यानंतर १९५० साली हिंदूंचा वाटा देशातील लोकसंख्येमध्ये तब्बल ८४ टक्के होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ साली आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. या परिषदेने आता भारतातील धार्मिक लोकसंख्येनुसार एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये २०१५ साली हिंदूंचा लोकसंख्येतील वाटा ७८ टक्क्यांपर्यंत आला आहे. आजही घटण्याचे प्रमाण सुरूच आहे.

स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपल्या भारत देशामध्ये हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये ७.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये घसरण होत असताना मुस्लीम, ख्रिश्चन व अन्यधर्मियांची लोकसंख्या मात्र वाढल्याचे दिसून येत आहे, त्यातही मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा आलेख प्रचंड असल्याने ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ‘जागो हिंदू जागो’ असा टाहो फोडण्याची वेळ आलेली आहे. हिंदूंसह जैन आणि पारशी या धार्मिक गटाचीही लोकसंख्या कमी झाली आहे. १९५० ते २०१५ या काळात मुस्लीम धर्मीय लोकसंख्येमध्ये ४३.१५ टक्क्यांची वाढ, ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्येत ५.३८ टक्के वाढ, शीख धर्मीय लोकसंख्येत ६.५८ टक्क्यांची वाढ दिसली आहे. बौद्ध धर्मीय लोकसंख्येतही थोडीफार वाढ झाली आहे. शेजारच्या राष्ट्रांचा आढावा घेतल्यास त्या त्या राष्ट्रांमध्ये तेथील प्रमुख धर्माची लोकसंख्या वाढत असताना भारतात मात्र प्रमुख धर्म असलेल्या हिंदू धर्माच्या लोकसंख्येचा एकूण लोकसंख्येतील टक्का घसरत चालला आहे.

भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा १९५० साली ८४ टक्के इतका होता. तो २०१५ साली कमी होऊन ७८ टक्क्यांपर्यंत खाली आला, तर मुस्लीम धर्मीय लोकसंख्येचा वाटा १९५० साली ९.८४ टक्के इतका होता. मात्र त्यामध्ये आता वाढ होऊन ही संख्या १४.०९ टक्क्यांवर पोहोचली आहे. केवळ भारतातच नाही, तर शेजारच्या नेपाळ व म्यानमार या देशांमधील हिंदू धर्माच्या लोकसंख्येचा आकडा घटत चालला आहे. म्यानमारमध्ये हीच घसरण १० टक्क्यांच्या खाली आहे. तर नेपाळमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या कमी होत असून त्यामध्ये ३.६ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. हिंदू धर्माच्या लोकसंख्येचा आलेख असाच घसरत राहिल्यास येत्या तीन-चार दशकांत हिंदू धर्म अस्तित्वालाही शिल्लक राहणार नाही व कोणे एकेकाळी या भूतलावर हिंदू धर्म अस्तित्वात होता, अशा पाऊलखुणा इतिहासाच्या पुस्तकात व गुगलवरच पाहावयास मिळतील, ही अतिशयोक्ती नसून हिंदू धर्मियांच्या घसरत्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरून व्यक्त केली जाणारी भीती आहे. हा आकडेवारीचा अहवाल कोणत्याही राष्ट्रीय-राजकीय

पक्षाने अथवा धार्मिक-जातीय संघटनेने बनविला नसून आर्थिक सल्लागार परिषदेने बनविलेला आहे. आर्थिक सल्लागार परिषदेचा हा अहवाल मे २०२४ मध्ये प्रकाशित झाला आहे. जगातील १६७ देशांतील लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास करून सदर अहवाल तयार करण्यात आलेला आहे. या अहवालात एक बाब स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे बहुसंख्यांक हिंदू असणाऱ्या आपल्या देशामध्ये अल्पसंख्याकांचे केवळ रक्षणच करण्यात येत नाही, तर त्यांची या ठिकाणी भरभराटही झाली आहे. हिंदूंची लोकसंख्या ७.८ टक्क्यांनी घसरत असताना दुसरीकडे मात्र मुस्लीम धर्मीयांची लोकसंख्या देशात ४३ टक्क्यांनी वाढली आहे.

काँग्रेसने अनेक दशके राज्य केल्यानंतर आपली ही परिस्थिती झाली आहे. जर त्यांच्या हातात पुन्हा सत्ता गेली असती तर आज हिंदूंना राहण्यासाठी देश उरला नसता, अशी भीती अहवाल प्रकाशित झाल्यावर हिंदूंकडून उघडपणे व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब हिंदूंनी वेळीच गांभीर्याने घेतली पाहिजे. कुटुंब नियोजन, वाढती महागाई, बेरोजगारी या सर्वांचा विचार करून हिंदू कुटुंब मर्यादित होऊ लागली आहेत. मात्र या समस्या अन्य धर्मियांना नाहीत का? याचा हिंदूंनी विचार करणे आवश्यक आहे. भारतात बहुसंख्याक हिंदू भविष्यात अल्पसंख्याक ठरू नये यासाठी हिंदूंनी वेळीच जागे होऊन विचारमंथन करणे काळाची गरज आहे. अन्यथा एक दिवस नक्कीच उजाडेल तो म्हणजे आपल्या पुढच्या पिढीतील वारसांना नमाज पढण्याची व आपल्या महिलांना बुरखा घालून फिरण्याची वेळ येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -