Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीAbdu Rozik : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! कोण...

Abdu Rozik : ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारी पत्नी?

अबुधाबी : ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. त्याची उंची केवळ तीन फूट असल्याने त्याला लग्नासाठी होकार मिळत नव्हता. अनेक कार्यक्रमांतून त्याने प्रेम आणि एकटेपणावर भाष्य केलं आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वीच त्याने जीवनात त्याला एक साथीदार मिळाल्याची घोषणा केली आणि त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. अखेर अब्दुचे दोनाचे चार हात होणार म्हणून चाहतेही प्रचंड खूश झाले आहेत. नुकतेच अब्दुने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर करत साखरपुडा उरकल्याची बातमी दिली.

अब्दुने हे फोटोज काल शेअर केले मात्र कॅप्शन पाहता साखरपुडा २४ एप्रिललाच पार पडल्याचे समजत आहे. या फोटोजमध्ये अब्दु फार खूश दिसत आहे. तो आपल्या होणार्‍या पत्नीला अंगठी घालताना दिसत आहे. मात्र, यात पत्नीचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. अब्दुने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,”Allhamdulillah 24.04.2024″. याचा अर्थ की अब्दुने २४ एप्रिल २०२४ रोजी साखरपुडा केला आहे”.

अब्दु रोझिकने ९ मे २०२४ रोजी इंस्टाग्रामवर एक घोषणा केली होती. ७ जुलै २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर १० मे २०२४ त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. अब्दुचा साखरपुडा दुबईत पार पडला आहे. दुबईतच त्यांचं लग्नदेखील होणार आहे. अब्दुने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या पारंपारिक ड्रेसमध्ये दिसून येत आहे. अब्दुच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अब्दुच्या होणार्‍या पत्नीचं नाव अमीरा आहे. मात्र, अद्याप अब्दुने तिचा चेहरा माध्यमांसमोर आणलेला नाही. चाहत्यांनाही त्याच्या पत्नीबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -