Monday, December 2, 2024
Homeताज्या घडामोडीSSC HSC Result : उत्तरपत्रिका तपासण्याकडे बोर्डाचं बारीक लक्ष; यावेळी लागणार कठीण...

SSC HSC Result : उत्तरपत्रिका तपासण्याकडे बोर्डाचं बारीक लक्ष; यावेळी लागणार कठीण निकाल?

‘या’ दिवशी दहावी व बारावीचे निकाल होणार जाहीर

पुणे : वाढत्या महागाईमुळे बोर्डाने दहावी बारावी परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बातमी ज्वलंत असतानाच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठी माहिती हाती लागली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या आहेत. यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Education) १०वी, १२वीची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली. यानंतर आता सगळ्यांचे लक्ष हे निकालाकडे लागले असून बोर्डाने याबाबत अधिकृत तारीख जाहीर केली आहे. (SSC HSC Result 2024)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे निकाल मे महिन्यातच लागणार असल्याची घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.

‘या’ तारखेला लागणार निकाल

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावी परीक्षेचा निकाल येत्या २० मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हं आहेत. बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

असा पाहा निकाल

विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट असते. विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -