
आकर्षक फुलं आणि आंब्यांनी केली मंदिराची सजावट
पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी अनेक मंदिर सजवून पूजा घालण्यात येतात. याचप्रकारे पुणे शहरातील सर्वस्व मानले जाणाऱ्या दगडूशेठ गणपतीची भव्य स्वरुपात आरास केली आहे. या गणरायाला आज ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला असून प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेक करण्यात आला.
अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला.
आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली.
आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.
आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.