Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही!

PM Narendra Modi : काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही!

विकास कामांमध्ये काँग्रेस भाजपाचा सामना करणं अशक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबारमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत निवडणुकीचे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. आता निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशासह राज्यभरात निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. देशभरात सर्व पक्ष व पक्षांचे नेते प्रचारसभा घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही महाराष्ट्रात सभा घेतली आहे.

नंदुरबार लोकसभेसाठी (Nandurbar Loksabha) महायुतीतील भाजपाच्या (BJP) उमेदवार डॉ. हिना गावित (Dr. Heena Gavit) यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. नंदुरबार लोकसभेसाठी महायुतीतील भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेतली असून या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कर्नाटकात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कर्नाटकात मुस्लिमांना एकाच रात्रीत ओबीसींचे आरक्षण दिले. कर्नाटक मॉडेल पूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र आपल्याकडे मोदींचा भरोसा, मोदींची गॅरंटी आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.

काँग्रेसच्या यंत्रणांकडून अफवा पसरवल्या जातात

काँग्रेसने गरिबांकडे कधीच लक्ष दिले नाही. आदिवासींचे आरक्षण काढून काँग्रेसने मुस्लिमांना दिले. आरक्षणाचा फायदा काँग्रेस मुस्लिमांना करून देत आहे. काँग्रेसने लिहून द्यावे मुसलमानांना आरक्षण देणार नाही. पण ते लिहून देत नाहीत, तुमचा हक्क लुटण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या यंत्रणांकडून अफवा पसरवण्याचे काम सुरु आहे. काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही.

विकास कामांमध्ये काँग्रेस भाजपाचा सामना करू शकत नाही

मी काँग्रेसप्रमाणे मोठ्या परिवारातून आलेलो नाही. मात्र आपल्याकडे मोदींचा भरोसा, मोदींची गॅरंटी आहे. मोदी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एसटी,एससी, ओबीसी आरक्षण कोणी घेऊ शकत नाही. विकास कामांमध्ये काँग्रेस आमचा सामना करू शकत नाही. वंचित वर्गाच्या अधिकारांचा मी चौकीदार आहे. भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -