Monday, September 15, 2025

एक ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून बनवा हे ड्रिंक, उन्हाळ्याचा नाही होणार त्रास

एक ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून बनवा हे ड्रिंक, उन्हाळ्याचा नाही होणार त्रास
मुंबई: उन्हाळा असो वा थंडी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. यामुळे प्रत्येक मोसमात खूप पाणी प्यायले पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातील. मात्र तुम्हाला माहीत आहे काकी उन्हाळाच्या दिवसात एक वेळ मीठाचे पाणी जरूर प्यायले पाहिजेय

उन्हाळ्याच्या दिवसांत लिक्विड आणि पाणी प्या

उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते. यामागे कारणही आहे की या दिवसांत खूप घाम निघतो. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भासते. जर तुम्ही या मोसमात पाणी कमी प्यायले तर डिहायड्रेशनचाही त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत जितके शक्य होईल तितके उन्हाळ्यात पाणी प्या. पाण्यासोबतच ज्यूस, लिक्विड घेतल्यात तुम्ही डिहायड्रेशनपासून बचाव कराल. उन्हाळ्याच्या दिवसांत मीठाचे पाणी प्यायल्याने अधिक फायदा होते. सगळ्यात आधी एक ग्लास पाणी घ्या त्यात चिमूटभर मीठ टाका. यामुळे जास्त फायदा होईल.

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास मीठाचे पाणी प्या

खाण्यापिण्यात गडबड, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होत असतो. यासाठी जर तुम्ही मीठाचे पाणी पिता तर पचनव्यवस्था ठीक होते. पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारी दूर होतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचावासाठी मीठाचे पाणी प्या.

कोमट पाण्यात मीठ टाकून प्या

शरीर बराच वेळ थंड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून प्या. मात्र एका मर्यादित प्रमाणात प्या.
Comments
Add Comment