मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एका वेळेसाठी पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या १०व्या स्थानावर होते. त्यावेळी आरसीबीच्या चाहत्यांनी प्लेऑफमध्ये खेळण्याच्या आशाच गमावल्या होत्या. मात्र विराट कोहलीने आपल्या दमदार खेळाडूने चेहराच बदलला.
आरसीबीने सलग ४ सामने जिंकत स्वत:ला प्लेऑफच्या शर्यतीत पुन्हा आणले. इतकंच नव्हे तर त्यांनी चेन्नई सुपरकिंग्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा खेळही खराब केला. जाणून घ्या आयपीएलच्या प्लेऑफचे समीकरण
त्याआधी पॉईंट्स टेबलची स्थिती समजून घेणे गरजेचे असते. पंजाब किंग्सवर शानदार विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १० पॉईंट्स आहेत तसेच त्यांचा रनरेटही ०.२१७ इतका आहे. दिल्ली आणि लखनऊपेक्षा हा रनरेट चांगला आहे.
चेन्नई, दिल्ली आणि लखनऊचे संघ १२-१२ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. पहिल्या तीन स्थानांवर कोलकाता नाईटरायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने आरसीबीने जिंकायलाच हवेत जर असे झाले तर त्यांचे १४ गुण होतील.
बंगळुरूचा पहिला सामना १२ मेला दिल्ली कॅपिटल्स आणि १८ मेला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आहे. आरसीबीसाठी हे दोन्ही सामने करो वा मरो आहेत. जर त्यांनी दिल्ली हरवले तर दोन्ही संघ बरोबरी गाठतील. मात्र आरसीबी चांगल्या रनरेटमुळे दिल्लीच्या पुढे जाईल.
आरसीबीच्या प्लेऑफच्या शर्यतीतील सर्वात मोठा अडथळा चेन्नई सुपर किंग्सचा आहे. त्यांचे १२ गुण आहे आणि रनरेटही चांगला आहे. त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत. दरम्यान, चेन्नईने जर त्यांचे तीनही सामने हरले अथवा दोन सामने मोठ्या अंतराने हरले तरच आरसीबीचा प्लेऑफमध्ये खेळण्याची शक्यता वाढू शकते.
लखनऊ सुपरजायंट्स
लखनऊ सुपरजायंट्सचे १२ सामन्यात १२ अंक आहेत ते जर दोन्ही सामने जिंकले तर आरसीबीच्या आशा संपुष्टात येतील . मात्र लखनऊचा संघ एक सामना जिंकला तर त्यांचे १४ गुण होतील. त्यांचा रनरेट खूप खराब आहे. जर दोन किंवा अधिक संघाचे १४-१४ गुण झाले तर लखनऊ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाणे निश्चित आहे.
लखनऊ-दिल्ली सामना निर्णायक
लखनऊ आणि दिल्ली यांच्यात १४ मेला होणारा सामना निर्णायक असेल. यातील जो संघ जिंकेल त्यांचे १४ गुण होतील. आरसीबीच्या नजरेने पाहिल्यास लखनऊ आणि दिल्लीला एक सामना हbangalरणे गरजेचे आहे. कारण कोणताही संघ जर दोन सामने जिंकला तर त्यांचे १६ गुण होतील आणि आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल.