Monday, January 13, 2025
Homeताज्या घडामोडीJalana Voting : मतदानापूर्वीच जालन्यात शेकडो मतदानपत्रांचा कचरा!

Jalana Voting : मतदानापूर्वीच जालन्यात शेकडो मतदानपत्रांचा कचरा!

व्हिडीओ होतोय व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या जोरदार प्रचार आणि मतदान (Voting) देखील सुरु आहे. राज्यात तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. दरम्यान, मतदानावेळी काही अनुचित प्रकारही घडले. काही ठिकाणी हाणामारी, तर काही ठिकाणी चक्क ईव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न झाला. काही ठिकाणी बोगस मतदानाचाही प्रकार झाल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता जालन्यात (Jalana) मतदानापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात बेवारस मतदान पत्रे (Voting cards) चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल १७६ मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली. याबाबत माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

नूतन वसाहत भागातील रहिवासी शुभम नारळे यांना काल सकाळी मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आली. याबाबत, त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग व कदीम पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान ओळखपत्रांचा पंचनामा केला.

कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ही मतदार ओळखपत्रे अज्ञात व्यक्तीने टाकलेली होती. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचा पुढील तपास सुरू केला आहे. सापडलेल्या ओळखपत्रांच्या नावांची बीएलओमार्फत तपासणी सुरू करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. मात्र, मतदानापूर्वीच येथे अशाप्रकारे मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने परिसरात बोगस मतदानाची चर्चा रंगली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -