Monday, April 21, 2025
Homeक्रीडाविराट कोहलीला सलामीला उतरवा, टी-२० वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलीचा रोहितला सल्ला

विराट कोहलीला सलामीला उतरवा, टी-२० वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलीचा रोहितला सल्ला

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४साठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचा शुभारंभ अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळेल. या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी विराट कोहलीने सलामीला उतरले पाहिजे. असा सल्ला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीने दिला आहे.

सौरव गांगुलीने सांगितले की, विराट खरच कमालीचा खेळ करत आहे. गेल्या रात्री विराटने जी फलंदाजी केली ती पाहण्यासारखी होती. त्याने लवकरात लवकर ९० धावा केल्या. आपल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याला सलामीला उतरवले पाहिजे. हे त्याने आपल्या गेल्या काही खेळीतून दाखवले आहे. भारताचा संघ चांगला आहे. बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्येही ते शानदार खेळ करत आहेत.

गांगुलीने याआधीही म्हटले होते की ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात फायनलचा सामना रंगेल. गांगुलीने म्हटले होते की या स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन चांगले संघ आहेत. मी नक्की आहे की हे दोन्ही संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये २०२३मधील कामगिरी करतील. भारताचा संघ चांगला आहे. सर्व मॅचविनर खेळाडू आहेत. मला माहीत आहे की रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने बेस्ट १५ खेळाडूंना निवडले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -