काय आहे प्रकरण?
मुंबई : ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्ज घेऊन परतफेड न करत एका फायनान्स कंपनीने बँकेची तब्बल २२.२९ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. बेटर व्हॅल्यू लीजिंग अॅन्ड फायनान्स लिमिटेड असं या आरोपी कंपनीचं नाव आहे. या प्रकरणी कंपनीच्या सात संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, बेटर व्हॅल्यू लीजिंग अॅन्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी मार्च २०१६ ते मार्च २०२० दरम्यान ॲक्सिस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे मुंबईतील कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे ॲक्सिस बँक कर्ज फसवणूक प्रकरण?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲक्सिस बँकेच्या ४३ वर्षीय असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला असून त्यानुसार कंपनीचा ॲक्सिस बँकेशी २००५ पासून व्यवहार होता आणि कर्जही घेतले होते. परंतु बेटर व्हॅल्यू लीजिंग अॅन्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी मार्च २०१६ ते मार्च २०२० या कालावधीत कट रचला आणि ॲक्सिस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. कंपनीवर २२.२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.