Thursday, May 22, 2025

महाराष्ट्रदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

SSC HSC Exam fee hike : दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात 'इतक्या' टक्क्यांनी वाढ

SSC HSC Exam fee hike : दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात 'इतक्या' टक्क्यांनी वाढ

जाणून घ्या नेमकं कारण काय?


मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल काही दिवसांतच जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकालांपूर्वीच्या वातावरणात येत्या वर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षादरम्यान दहावी आणिबारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी तसेच बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षादरम्यान होणाऱ्या परीक्षांसाठी १२ टक्के शुल्कवाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही विद्यार्थ्यांना पैसे भरावे लागणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे.



इतक्या रुपयांची परीक्षा शुल्कात वाढ


राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात ५० ते १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर १७ नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्कही महागलं आहे. १७ नंबरचा अर्ज/ फॉर्म भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे.


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क ४२० रुपयांवरून ४७० रुपये केलं आहे. तर, १७ नंबरच्या फॉर्ममध्ये ३० रुपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात ११० रुपयांची वाढ केली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे दर जाहीर केले असून आता दहावी, बारावीच्या परीक्षार्थींना अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.

Comments
Add Comment