Friday, December 13, 2024
Homeक्रीडाIPL 2024CSK vs GT: गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक ठोकलं, चेन्नईचं वादळ तब्बल ३५...

CSK vs GT: गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक ठोकलं, चेन्नईचं वादळ तब्बल ३५ धावांनी रोखलं…

CSK vs GT: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. चेन्नईने गुजरातला फलंदाजीसाठी बोलावले. मात्र गुजरातला फलंदाजीला बोलवणे चेन्नईला महागात पडले. गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांनी शतकं ठोकली. शुभमन गिलने अवघ्या ५० चेंडुत शतक करत इतिहास रचला. तर त्या पाठोपाठ साई सुदर्शनने देखील ५१ चेंडुत १०३ धावा केल्या. सलामीच्या जोडीने केलेल्या ऐतिहासिक खेळीमुळे गुजरातने २३१ धावांचा डोंगर चेन्नईसमोर उभा केला.

गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सलामी जोडी फक्त १-१ धावा करुन बाद झाली. तर तिसऱ्या नंबरवर खेळायला आलेला ऋतुराज गायकवाड पहिल्याच चेंडुवर परतला. त्यानंतर आलेल्या डॅरेल मिचेलने आक्रमक खेळी करत ३४ चेंडुत ६३ धावा बनवल्या. त्याच्यासोबत आलेल्या मोईन अलीने देखील ३६ चेंडुत ५६ बनवुन संघाला सामन्यात परत आणले. मोहित शर्माने केलेल्या गोलंदाजीसमोर चेन्नईचे फलंदाज असमर्थ ठरले. मोहितने ३ गडी बाद करत गुजरातला मागे खेचले. त्याच बरोबर राशिद खानने देखील २ गडी बाद केले.

शिवम दुबे आणि रविद्र जडेजाच्या खेळीने चेन्नईच्या संघाला आशेचा किरण दिसला. पण ही जोडी फार काळ टिकु शकली नाही. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या आगमनाने चाहते खुश तर झाले, पण तोपर्यंत सामना चेन्नईच्या हातातुन निसटला होता. धोनीने २६ धावा बनवत संघाला १९६ धावसंख्येपर्यत पोहचवले. त्यामुळे चेन्नईचा तब्बल ३५ धावांनी पराभव झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -