
मुंबई: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला म्हणजेच १० मे २०२४ला अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण साजरा केला जात आहे. हा सण सुख, समृद्धी आणि धनदायक मानला जातो.
अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त बघण्याची गरज सते. त्यामुळे लग्न, खरेदी तसेच नवीन कामांना या दिवशी सुरूवात केली जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मौल्यवान गोष्टींची खरेदी केल्याने लक्ष्मी माता स्थायी रूपाने घरात वास करते. अक्षय्य तृतीयेला पूजा-पाठ केल्याने अधिक सुखद परिणाम मिळतात.
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व
धार्मिक मान्यताप्रमाणेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक पौराणिक घटना घडल्या होत्या. या दिवशी ब्रम्हाचे पुत्र अक्षय्यचा प्रकट दिवस मानला जातो. या दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते. ग्रंथानुसार या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाची सुरूवात झाली होती. अक्षय्य तृतीयेलाच भगवान विष्णूंनी नर आणि नारायणाच्या रूपात अवतार घेतला होता.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केले जाणारे दान, पूजा-हवन ही सर्व पुण्य कार्ये अक्षय़्य फळ देतात. सोबतच जे लोक अक्षय्य तृतीयेला शुभ गोष्टी खरेदी करतात त्यांना जीवनभर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.
अक्षय़्य तृतीयेला खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त
सकाळी ५.३३ ते १०.३७ वाजेपर्यंत
दुपारी १२.१८ ते १.५९ वाजेपर्यंत
संध्याकाळी ४.५६ ते १०.५९ वाजेपर्यंत