RCB vs PBKS: बंगळुरुचा 'विराट' विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ...

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात १० षटकांनंतर गारासोबत जोरदार पाऊस झाला. मात्र काही वेळाने पुन्हा सामना सुरू झाला. यानंतर विराट कोहलीने धावांचा वर्षाव केला. या खेळीच त्याने ४७ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. याशिवाय रजत पाटीदारने २३ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले. कॅमेरन ग्रीनने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. ग्रीनने २७ चेंडूत ४६ धावा केल्या.


पंजाब किंग्जचा हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षल पटेलने ४ षटकांत ३८ धावांत ३ फलंदाज बाद केले. विद्वथ कावरेप्पा याने २ गडी बाद केले. अर्शदीप सिंगने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. तर कर्णधार सॅम करनने रजत पाटीदारला बाद केले.बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २४१ धावांचा डोंगर उभारला आहे. पंजाबला विजयासाठी २४२ धावा कराव्या लागणार आहेत.


बंगळुरुने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर विशेष काही करु शकले नाहीत. बेअरस्टोने १६ चेंडुत २७ धावा करत बाद झाला. तर प्रबसिमरन फक्त ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रोसोने संघाची धुरा सांभाळली. त्याने २७ चेंडुत ६१ धावा बनवुन संघाला बळकटी दिली.पण कर्ण शर्माच्या चेंडुवर तो झेलबाद झाला. शशांक सिंग आणि सॅम करनच्या जोडीने पंजाबला आशा दाखवली खरी, पण विराटच्या थ्रोमुळे शशांक रन आऊट झाला. तर फर्गुसनने करनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर बंगळुरुच्या गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक  गडी बाद करत १७ षटकातच पंजाबचा खेळ गुंडाळला. पंजाब १० गड्यांच्या बदल्यात १८१ धावाच बनवु शकले. बंगळुरुचा तब्बल ६० धावांनी विजय झाला.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 Lionel Messi : अर्जेंटिनाच्या चाहत्यांसाठी डबल धमाका! एमबाप्पेला मागे टाकत मेस्सीचा नवा विक्रम तर अर्जेंटिना सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये लिओनेल मेस्सी (FIFA World Cup 2026 Lionel Messi) पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

FIFA World Cup 2026 : मेस्सी चमकला, इंग्लंड गारद! २-१ च्या थरारक विजयासह अर्जेंटिना फायनलमध्ये

अटलांटा : लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने (Argentina) पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Comeback) करत इंग्लंडचा

Axar Patel: आयसीसी एकदिवसीय अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अक्षर पटेल टॉप टेनमध्ये

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील प्रभावी कामगिरीबद्दल भारतीय

FIDE World Cup : फिडेकडून २०२७ विश्वचषकाचे नवे स्वरूप जाहीर; स्पर्धकांच्या संख्येत आणि बक्षीस रकमेत वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) २०२७ च्या सत्रापासून लागू होणाऱ्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या

Japan Open 2026 : जपान ओपन बॅडमिंटन २०२६: लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टीचे पहिल्याच फेरीतच आव्हान संपुष्टात

टोकियो : जपान ओपन २०२६ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी हे दोघेही आपापल्या पहिल्या

ICC ODI World Cup : आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाचे स्वरूप बदलले; आता सुपर सिरीज आणि सुपर ७ फेरीचा समावेश

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या स्वरूपात