Tuesday, December 10, 2024
Homeक्रीडाIPL 2024RCB vs PBKS: बंगळुरुचा 'विराट' विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ...

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात १० षटकांनंतर गारासोबत जोरदार पाऊस झाला. मात्र काही वेळाने पुन्हा सामना सुरू झाला. यानंतर विराट कोहलीने धावांचा वर्षाव केला. या खेळीच त्याने ४७ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. याशिवाय रजत पाटीदारने २३ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले. कॅमेरन ग्रीनने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. ग्रीनने २७ चेंडूत ४६ धावा केल्या.

पंजाब किंग्जचा हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षल पटेलने ४ षटकांत ३८ धावांत ३ फलंदाज बाद केले. विद्वथ कावरेप्पा याने २ गडी बाद केले. अर्शदीप सिंगने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. तर कर्णधार सॅम करनने रजत पाटीदारला बाद केले.बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २४१ धावांचा डोंगर उभारला आहे. पंजाबला विजयासाठी २४२ धावा कराव्या लागणार आहेत.

बंगळुरुने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर विशेष काही करु शकले नाहीत. बेअरस्टोने १६ चेंडुत २७ धावा करत बाद झाला. तर प्रबसिमरन फक्त ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रोसोने संघाची धुरा सांभाळली. त्याने २७ चेंडुत ६१ धावा बनवुन संघाला बळकटी दिली.पण कर्ण शर्माच्या चेंडुवर तो झेलबाद झाला. शशांक सिंग आणि सॅम करनच्या जोडीने पंजाबला आशा दाखवली खरी, पण विराटच्या थ्रोमुळे शशांक रन आऊट झाला. तर फर्गुसनने करनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर बंगळुरुच्या गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक  गडी बाद करत १७ षटकातच पंजाबचा खेळ गुंडाळला. पंजाब १० गड्यांच्या बदल्यात १८१ धावाच बनवु शकले. बंगळुरुचा तब्बल ६० धावांनी विजय झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -