Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीBhupendra Jogi : 'नाम? भूपेंदर जोगी!' या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या...

Bhupendra Jogi : ‘नाम? भूपेंदर जोगी!’ या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्रवर हल्ला!

पाठीला आणि हाताला ४० टाके

भोपाळ : मध्यप्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाखतीदरम्यान म्हटलेल्या ‘नाम? भूपेंदर जोगी!’ या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्र जोगीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दोन व्यक्तींनी भूपेंद्रवर हल्ला केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर भूपेंद्रला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली आहे.

युट्युबर भूपेंद्र जोगीचे न्यू मार्केट परिसरात रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो दुकानातून घरी परतत असताना रोशनपुराजवळ दोन तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात भूपेंद्र जोगी गंभीर जखमी झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी जखमी भूपेंद्र जोगीला रुग्णालयात नेले. त्याच्या पाठीला आणि हाताला ४० टाके पडले आहेत. या प्रकरणी अरेरा हिल्स पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांना गुन्हेगारांची कोणतीही माहिती मिळाली नाही.

भूपेंद्र जोगीने दावा केला आहे की, त्याला दोनदा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भूपेंद्रचे कोणाशीही वैर किंवा वाद नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. भूपेंद्र जोगीने त्याचे रुग्णालयातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये भूपेंद्र हा त्याची हेल्थ अपडेट देताना दिसत आहे.

कोण आहे भूपेंद्र जोगी?

‘नाम? भूपेंदर जोगी!’ या एका मुलाखतीमधील डायलॉगमुळे भूपेंद्र जोगी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या डायलॉगचे रिल सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच या डायलॉगवर अनेक नेटकऱ्यांनी मीम्स देखील बनवले. या मीम्समुळे आणि व्हायरल झालेल्या रिलमुळे भूपेंद्र जोगीला लोकप्रियता देखील मिळाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -