
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये २०मे पर्यंत वाढ केली आहे. ईडी उद्या दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच ईडी आपल्या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार आणि किंगपिन म्हणून केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख करणार आहे.
ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित मनी ट्रेल शोधून काढले आहे. तसेच उद्या सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या जामिनावरही सुनावणी होणार असल्याचा दावा ईडीने केला आहे.