मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईल हेच याचे कारण आहे.
जर तुम्ही स्वत:वर लक्ष देत नसाल हा लठ्ठपणा वाढत जातो. यामुळे केवळ तुमची पर्सनॅलिटीच खराब होत नाही तर अनेक आजारांना निमंत्रण देते. मात्र जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही लहान लहान सुधारणा केल्या तर तुम्ही लठ्ठपणा नियंत्रित करू शकता. तसेच फिटही राहू शकता.
येथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत जे चुकूनह रात्रीच्या वेळेस खाऊ नये.
रात्रीच्या जेवणात अथवा झोपण्याच्या आधी तळलेले-भाजलेले पदार्थ खाऊ नयेत.
फॅटी फूड्सच्या सेवनाने तुमच्या शरीरात चरबी वाढते.जर तुम्ही रात्री हे खात असाल तर यामुळे लठ्ठपणा वाढतो.
मटणामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असतात यामुळे रात्रीचे सेवन करू नये.
आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि साखर असते त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर रात्रीच्या वेळेस आईस्क्रीम खाऊ नका.
फ्रोझन फूडमध्येही अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव असतात जे फॅट वाढवतात यामुळे याचे सेवन करू नये.