Thursday, April 17, 2025
Homeक्रीडाIPL 2025SRH vs LSG: हैदराबादचा धमाकेदार विजय, लखनऊला १० विकेटनी हरवले

SRH vs LSG: हैदराबादचा धमाकेदार विजय, लखनऊला १० विकेटनी हरवले

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी हैदराबादच्या फलंदाजांनी पूर्ण १० षटकेही घेतली नाहीत.

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात १६७ धावांची भागीदारी झाली. ट्रेविस हेडने ३० बॉलमध्ये ८९ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले. तर दुसरीकडे अभिषेक शर्माने २८ बॉलमध्ये ७५ धावा ठोकल्या. त्याने या खेळीत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले.

दोघांनी पहिल्या षटकापासूनच जोरदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे हैदराबादने ६५ चेंडू आणि १० विकेट राखत हे आव्हान सहज पेलले.

१६६ धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चौथ्याच ओव्हरमध्ये ५० धावांचा आकडा पार केला होता. त्यानतंर पॉवरप्ले संपेपर्यंत संघाने १०७ धावा केल्या होत्या एकीकडे ट्रेविस हेडनो १६ बॉलमध्ये ५० धावा तडकावल्या तर अभिषेक शर्माने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १९ बॉल घेतले. त्यानंतर हेड आणि अभिषेक लखनऊच्या गोलंदाजांवर तुटून पडले. हैदराबदाने १० षटकेही पूर्ण केली नाहीत. यातील ७ षटक असे होते ज्यात त्यांनी १५ हून अधिक धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -