Tuesday, July 1, 2025

सदावर्ते दाम्पत्याचे एसटी बँकेतील संचालकपद रद्द

सदावर्ते दाम्पत्याचे एसटी बँकेतील संचालकपद रद्द

मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे एसटी बँकेतील संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सहकार खात्याने ही कारवाई केली आहे. सदावर्ते दाम्पत्य यापुढे बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून राहणार नाहीत. याशिवाय, संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशिर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्ते (दाम्पत्यावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.


वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना १४ दिवस आधी या सभेची सुचना देणे आवश्यक होते. परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हव्या त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. मुख्य म्हणजे पोटनियम बदलाची सुचना सभासदांना देणे बंधनकारक होते. या अनुषंगाने बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नींची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणलेला ठराव सहकार खात्याने रद्द केल्याने आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत.


अॅड. गुणरत्न सदावर्ते कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहिलेले नाहीत. ते आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहिलेले आहे. त्यांच्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, सदावर्ते दाम्पत्याविरोधात एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे ऑक्टोबर २०२३ मध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार सहकार आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करत संचालक पद रद्द करण्याचा निर्णय दिला.


संदीप शिंदे यांनी सांगितले की, सदावर्ते यांची सत्ता एसटी बँकेत आली, तेव्हापासून त्यांचा कारभार चांगला राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment